दैनिक चालु वार्ता
रायगड ( म्हसळा ) प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – नाईक-अंतुले महाविद्यालयात मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत पंचप्रण शपथ घेऊन ७५ वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
दि. ०९.०८.२०२३ रोजी, कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबईचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा-रायगड संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मुश्ताक अंतुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ व्हावी म्हणून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात होतच असतात. अलीकडेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, बंगलोर या संस्थेकडून महाविद्यालयास बी++ या उत्कृष्ट नामांकनाने प्रमाणित करण्यात आले आहे. राज्य शासन व मुंबई विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार “मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज या उपक्रमाचा उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ ग्रहण केली. त्यानंतर क्रांती दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे महाविद्यालयाचे माजी प्र. प्राचार्य प्रा. एम. एस. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय सेवा योजना व बोटनी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण, प्रा. जगदिश शिगवण, बोटनी विभागाच्या प्रा. सलमा नझीरी राष्ट्रीय सेवा योजना सदस्य प्रा. कानिफ भोसले, प्रा. डाॅ. संजय बेंद्रे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आदीनी परिश्रम घेतले.