नुकतीच प्रदर्शित झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ ठरली अव्वल …
मुंबई : चित्रपटांपेक्षा मालिका पाहणार प्रेक्षकवर्ग जास्त आहे. चित्रपट एकदा येऊन निघून जातात. पण मालिका आणि मालिकेतील पात्र दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि त्यांचे मनोरंजन करतात.त्यामुळे मालिकेतील ही पात्र प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्यातील भाग होऊन जातात.
या मालिकांसाठी त्यांचा टीआरपी खूप महत्त्वाचा असतो. २ ते ८ सप्टेंबर २०२३चे टीआरपी रेटिंगचे आकडे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आघाडीवर आहे.मराठी टेली बझ या इंस्टाग्राम पेजने मराठी मालिकांचे ऑनलाईन रेटिंग शेअर केले आहे. या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे.
या मालिकेने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे स्थान घेतले आहे. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता किती आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तेजश्री प्रधानला मराठी टेली बझने मालिकेच्या या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधानाने देखील ही पोस्ट तिच्या इंस्टग्रामवर शेअर केली आहे.
तर ‘ठरलं तर मग’ ही मालिका तिचे पाहिले स्थान टिकविण्यात यशस्वी झाली आहे. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तेजश्री प्रधान ची ‘प्रेमाची गोष्ट’ आणि जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ या मालिकांमध्ये चांगलीच सुरस पाहायला मिळणार आहे.