दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर): विद्यार्थ्यांना आपले सण, समारंभ तसेच विशेष दिवस याची गोडी शालेय जीवनापासून लागावी व त्याची जोपासना करण्याचे संस्कार बालमनावरती व्हावेत या अनुषंगाने येथील सप्तगिरी पोदार लर्न स्कूल या सी.बी एस ई शाळेत हिंदी दिवस व बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आहे. याचे औचित्य साधून एक खास परिपाठ शाळेत घेण्यात आला.
विशेष म्हणजे हा संपूर्ण परिपाठ हिंदी भाषेत घेण्यात आला. या परिपाठात हिंदी सुविचार,नवीन शब्द, प्रश्न मंजुषा, प्रतिज्ञा,भाषणे,समूह नृत्य, अक्षर कलाकृती , शिक्षक संवाद इ.चा समावेश करण्यात आला होता.
परिपाठाची सुरुवातीला शालेय वाद्यवृंदाने हिंदी प्रार्थना ‘ सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू’ अतिशय सुमधुर स्वरात सादर केली.
त्या नंतर पुढील विद्यार्थ्यांनी परिपाठात सहभाग घेतला- सुविचार श्रीनिवास एमेकर,नवीन शब्द – राधिका साखरे ,प्रतिज्ञा – धनश्री टाकळीकर,सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा -रिया पंदिलवार, विद्यार्थी भाषणे- अपूर्वा खांडेकर,अनुश्री टाकळीकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले.
शिक्षक संवाद उपक्रमात हिंदी विषय अध्यापक फारूक सय्यद सर म्हणाले कि, हिंदी भाषेला अनन्य साधारण महत्व आहे. इतर भाषांप्रमाणे हिंदी भाषेचे देखील राष्ट्र समृद्धीसाठी मोलाचे योगदान आहे.
त्याचबरोबर त्यांनी विद्याथ्यांना बैल पोळ्याबद्दल माहिती देतांना सांगितले कि , शेतकरी व त्यांची बैल जोडी यांचे अतूट नाते आहे.बैल पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैल जोडी प्रति कृतज्ञता व्यक्त करत असतो.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी ‘ हिंदी भाषा , राष्ट्र कि भाषा ‘ या गीतावर सुंदर समुह नृत्य सादर केले.
परिपाठाचे सूत्रसंचालन ज्योती हांडे व स्नेहा राजुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन . साईगणेश भातनाते
यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी . माधव येलगे सर फारूक सय्यद सर, साईगणेश भातनाते सर, दिगंबर मठवाले सर, राहुल कदम सर , .पवन कांबळे सर व सुभाष मरखेले सर आदींनी विशेष परिश्रम घेतले.