धनगर समाजास अनुसूचित जमातीत (एस.टी.)समावेस करा…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील
धनगर समाजाच्या वतीने आरक्षण आंदोलनावरून सोलापूर येथील समाज बांधवावरील झालेल्या मारहानीचा जाहीर निषेध नोंदवून अहमदनगर चौंडी येथे धनगर समाजा अनुसूचित (एस. टी.) जमातीत समाविष्ट करा या करीता चालु असलेल्या उपोषणास मंठा तालुका धनगर समजाचा पाठींबा असल्या बाबतचे मंठा तहसीलदार यांना निवेदन दिले..
की, धनगर समाजाच्या आरक्षणा करिता धनगर समाज बांधवास मारहान केलेल्या घटनेचा मंठा तालुका धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे.
चौंडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथे धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजास अनूसुचित जमातीमध्ये (एस.टी.) समाविष्ट करण्या बाबतचे आमरण उपोषण चालू आहे..
त्या आमरण उपोषणास मंठा तालुका धनगर समजाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला असुन जर आमच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास चौंडी या गावाच्या धर्तीवर मंठा तालुक्यात देखील आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा ईशारा देण्यात आला यावेळी निवेदन देताना
प्रसादराव गडदे, भगवानराव गायकवाड, शिवाजी रिकामे प्रदीप गडदे, अजय नरोटे, बालासाहेब डोईफोडे,श्रीनिवास कुरधने, नामदेव पानजवंजाळसह समाज बांधव उपस्थिती होते…