गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फुलला आनंद….
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा.दवणे..
जालना (मंठा)तालुक्यातील केहाळ येथील जि. प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेशसाठी निधी मंजुर होवुन त्या निधीतून गणवेश खरेदी करून ते गणवेश केहाळ वडगाव येथील शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत हरबक , व सदस्यांच्यां हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन कांबळे सर यानी केले.
मुख्याध्यापक एस. एन.चरकेवाड, हिम्मतराव दवणे, भीमराव खरात, भारत रणवीर, ऋषिकेश दवणे, भागवत मुसळे, सचिन दवणे व विद्यार्थी उपस्थित होते.