दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (:देगलूर )देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमली देगलूर नगरी@
देगलूर: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज तालुका प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली.
येथील हुतात्मा स्मारक पोलीस स्टेशन समोरून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि स्मारकास पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार संजय नागमवाड ,बालाजी सुरनर, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, गटशिक्षणाधिकारी डी.के. तोटरे , येरगी चे सरपंच संतोष पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी,शिवशंकर झंपलवाड,सर्व प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
ही तिरंगा रॅली हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने हुतात्मा स्मारक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक महात्मा बसवेश्वर चौक जुना सराफा लाईन हनुमान मंदिर चौक महाराष्ट्र बँक होटल बेस हनुमान मंदिर ते मेन रोड होऊन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सांगता झाली.
येथे विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत खाऊचे वाटप करण्यात आले.
तिरंगा रॅलीमध्ये तालुक्यातील येरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर लेझीम नृत्य उत्कृष्टपणे सादर करून नागरिकांची मने जिंकली तसेच शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लेझीम नृत्य ठीक ठिकाणी सादर केले.
या तिरंगा रॅली त शहरातील देगलूर महाविद्यालय देगलूर मानव्य विकास विद्यालय,साधना हायस्कूल, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, मौलाना अबुल कलाम उर्दू शाळा , सरस्वती माध्यमिक विद्यालय,ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल, परम पूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालय, पूजा पब्लिक
स्कूल आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदरील तिरंगा रॅलीमध्ये देगलूर महाविद्यालय व मानव्य विकास विद्यालय येथील एनसीसी विभागाच्या मुला मुलींनी गणवेशात सहभागी होऊन नागरिकांचे लक्ष वेधले.