दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर)-दिनांक 13 सप्टेंबर 2023 प.पू.
गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर व परीक्षक म्हणून विद्यासभा संयोजक सचिन जाधव मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व मासिक पद्य रूपा पाचारे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता कुलकर्णी यांनी सादर केले.
यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कुठलेही स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी अनेक थोरवीरांनी प्राण्यांचीआहुती दिली. तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले व या आंदोलनात स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान खूप महत्त्वाचे होते. असे याप्रसंगी भाषणातून ऐकण्यास मिळाले .
शेवटी अध्यक्ष समारोपात उपस्थित मुलांचे कौतुक केले व आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने घेण्यात येणारे या विविध स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे याप्रसंगी त्यांनी सांगितले. तसेच क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी घोषित करण्यात येईल असे सांगण्यात आले व वैयक्तिक गीत जोवर गोदामाई वाहे….हे गीत अर्चना सुरशेटवार यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्विनी कदम यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.