दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गावाचे नाव मोठे करूया,असे आवाहन जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नामदेव गिरमकर यांनी केले.
‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत उरळगाव येथे ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानाची सुरवात केली.गावांमध्ये,प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात झाली.यात सफाई मित्र ही सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग व ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटी चेअरमन, सर्व संचालक, ग्रामस्थ व महिलांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन स्वच्छतेच्या कामी आपला हातभार लावला.शिक्षकांनी विद्यार्त्यांना आरोग्य आणि स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.
याबाबतच्या आवाहनात सरपंच निकिता ताई सात्रस म्हणाल्या, स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ हे अभियान यशस्वी करायचं आहे. ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे.या वेळी मा. तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सात्रस प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक लंघे सर, हायस्कूलची मुख्याध्यापिका सौ मिसाळ मॅडम, आरोग्य केंद्राच्या सौ शिरसाठ मॅडम, आशा वर्कर, ग्रा. सदस्या राणीताई बांडे, कोमल ढमढेरे, अनिता चव्हाण, रंजना चव्हाण, रामदास काळे, जन्याबापू काळे, दीपक काळे, अमोल बांडे, मोहन सात्रस, विनायक सात्रस, हनुमंत चव्हाण, विठ्ठल बांडे, प्रदीप ओव्हाळ, सुरेश कोळी, पोपटराव गिरमकर आदींनी स्वच्छता मोहीम यशस्वी पणे पार पाडली
आपले गाव कचरामुक्त आणि स्वच्छ असावे असे ध्येय घेऊन आता आपण वाटचाल करु.अशी शपथ सर्व ग्रामस्थ, विध्यार्थ्यानी घेतली.शेवटी विद्यार्त्यांना खाऊ वाटप करून भाऊसाहेब कोकडे यांनी आभार मानले.