दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- मुंबई येथे दिनांक ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॅरा (दिव्यांग) बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत लता उमरेकर यांनी सुवर्ण पदक पटकावले असून तिची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.ह्या स्पर्धा पॅरालम्पिक स्पोर्ट्स असो. आणि पॅरालम्पिक कमिटी ऑफ इंडिया ( PCI )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती, ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून बॅडमिंटन पटू सहभागी झाले होते.स्पर्धेत प्रथम क्रमांक लता उमरेकर ( नांदेड ) , द्वितीय क्रमांक रूही शिंगाडे ( तालुका क्रीडा अधिकारी ठाणे), तृतीय क्रमांक अंकिता उलभगत ( शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त, सोलापूर ) यांनी पदके पटकावली आहेत.वरील यशाबद्दल महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स चे अध्यक्ष मा. नाळे सर, सचिव तिवारी सर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार सर, नांदेड स्टेडियम व्यवस्थापक व सहायक आयुक्त चवरे सर, प्रशिक्षक चेतन माने, किरण माने यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.