गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा संस्थाचालकांची अत्यंत महत्वाची बैठक नांदेड येथे शुक्रवार दि 27 ऑक्टोबर रोजी मालेगाव रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळील हॉटेल पद्मावती येथे सकाळी 10.30 वाजता होणार असून या बैठकीमध्ये आरटीई. फी परताव्या बाबत लढा तीव्र करून कोर्टात याचिका दाखल करणे, मागील आरटीई प्रतिपूर्ती परतावा रक्कम मिळेपर्यंत पुढील शैक्षणिक वर्षात आर. टी. इ. प्रवेशावर बंदी घालने, संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची पूर्वतयारी करणे, मेस्टा स्पर्धा परीक्षा आयोजन करणे, मेस्टा राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन करणे
या विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यात येणार आहे. या महत्वाच्या बैठकीला मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील, छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाचे वकील ॲड. अविनाश आवटे, मेस्टा चे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.नामदेवराव दळवी, मेस्टा चे कार्याध्यक्ष विजय पवार, मेस्टा चे समन्वयक सचिन मलिक, राज्य सहसंघटक सुदर्शन शिंदे, प्रमुख मार्गदर्शक श्रीनिवास द्यावरशेट्टी, मराठवाडा संघटक श्रीमंत सानप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी इंग्रजी शाळांच्या दृष्टीने महत्वाच्या या बैठकीस नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा संस्थाचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मेस्टा चे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी उमाटे, मराठवाडा सचिव भारत होकर्णे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील टाकळीकर, सचिव राजकुमार घोडके, सहसचिव महेश कुंटुरकर यांनी केले आहे.