
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर (माढा):आज दि. ३०/१०/२०२३ रोजी महामार्ग पोलीस मदत केंद्र, मोडनिंब यांच्यावतीने मृत्युंजय दूत बैठक व कार्यशाळेचे टेंभुर्णी येथे आयोजन करण्यात आले होते.
मा. अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल, (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य मुंबई, पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम,महामार्ग सुरक्षा पथक पुणे विभाग, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळेमध्ये बोलताना पोलीस निरीक्षक श्री योगेश वेळापूर यांनी सांगितले की, महामार्गावर वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांनी वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये, भरधाव वेगाने वाहन चालवू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे महामार्गावर कुठे अपघात झाल्याचे दिसून आल्यास घाबरून न जाता स्थानिक पोलिसांना व महामार्ग पोलिसांना याची माहिती द्यावी व तात्काळ टोल हेल्प नंबर १०३३ व १०८ नंबर वर कॉल करून मदत द्यावी व जखमींना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी मदत करावी आपण केलेल्या मदतीमुळे अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळेल व जखमींचे प्राण वाचतील असे सांगून मृत्युंजय दूत या संकल्पनेबाबत व स्व. बाळासाहेब ठाकरे आरोग्य अपघात विमा, गोल्डन अवर या योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली.
तसेच अपघातातील जखमींना मदत केलेल्या मृत्युंजय दुत अकबर खान, अतुल डुचाळ, प्रशांत शिंदे, बाळासाहेब लोंढे, व राजाभाऊ बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महामार्ग पोलीस मदत केंद्र, मोडनिंब चे प्रभारी अधिकारी सत्यसेन जाधव, पोलीस हवालदार गणेश शिंदे, अभिजीत मुळे, विजय भगत हे उपस्थित होते.