पाबळ सुनिल जिते…
इंद्रायणी सेवा फाऊंडेशन आळंदी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कविवर्य दत्तात्रय जगताप यांना चंद्रफुल लाॅन्स आळंदी या ठिकाणी मा. शिवलाल जाधव साहेब उपकुलपती विक्रम शिला हिंदी विद्यापीठ व योगी स्वामी ऋतदेवजी
बाबा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सुधीर भाऊ मुंगसे सेवेकरी फाऊंडेशन, उद्योजक पानसरे साहेब , व इतर मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रय जगताप हे गेली अनेक वर्षे सामाजिक व साहित्य क्षेत्रात आपले योगदान देत आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुत्रसंचालन राजेश दिवटे यांनी केले.