दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):अयोध्येमध्ये आज श्री राम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त इंदापूर शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येने अनेक राम भक्त इंदापूर येथील श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित होते
यावेळी या मंदिरामध्ये आयोद्येतील श्री राम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोठ्या स्किन द्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते यांनी संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांमध्ये बसून पाहिले तसेच यावेळी त्यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली .
मोठ्या संख्येने राम भक्तांनी जय जय श्री रामाचा जयघोश करीत, आनंदी भक्तीमय वातावरणात या सुंदर क्षणाचा व प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा क्षण ,प्रसंग आणि ते वैभव आपल्या डोळ्यामध्ये साठवून राम भक्तांनी श्री रामाचे दर्शन घेतले.