दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी प्रवीण पवार दौंड- 9923531092
दौंड. दि. २६- धनाजी शामराव गरदडे एस.सी माध्यमिक आश्रम शाळेमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.समाजसेविका विद्या तारे, व मुख्याध्यापक धम्मपाल कांबळे, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहन करण्यात आले. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे केली .आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रज्ञा कांबळे, यांनी केले. प्रास्ताविक कु.नीता भंगारे, यांनी केले.आभार लिपिक गणेश शितोळे, यांनी मानले .तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैशाली पवार,शिंदे सर,अधीक्षक खान सर ,महेश कांबळे सर,शिक्षकेत्तर कर्मचारी नवनाथ नागरे,आकाश कामालापूर,रोहित पवार, व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.