लोहा – कंधार मतदारसंघातुन हजारो कार्यकर्ते वर्धापनदिनाला उपस्थित राहणार – हनुमंतभाऊ लांडगे
गोविंद पवार / नांदेड
आज दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १२.३० छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानावर शिवा संघटनेचा २८ वा व सेवा जनशक्ती पार्टीचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे तथा सेवा जनशक्ती पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रासपा -शिवा संघटनेचे आमदार रत्नाकर गुट्टे, उमाकांत शेटे,अभयराव काल्लावार, शिवचरण अण्णा बिराजदार ,दता भाऊ खंकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असुन या कार्यक्रमाला लोहा – कंधार तालुक्यातुन हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांनी दिली. , यावेळी शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष साधु पाटील वडजे, सरपंच मारोतराव सोनवळे, शुभम घोडके, सुर्यकांत आणेराव , अंकुश पाटील कदम, संजय अकोले, नवनाथ दगडगावे, आदी उपस्थित होते.