दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर): दि. २६ जानेवारी रोजी निमगाव केतकी येथील सागर म्हेत्रे यांच्या विहिरीमध्ये एक कोल्हा व विषारी जातीचे मण्यार साप पडल्याचे सागर म्हेत्रे यांना आढळून आले. असता त्यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे ॲडव्होकेट सचिन राऊत यांच्याशी संपर्क केला. लागलीच सचिन राऊत यांनी बारामती व दौंड या ठिकाणची असणारी रेस्क्यू टीम यांना फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेऊन स्वतः त्यांच्याबरोबरच त्यांना मदत करून एडवोकेट सचिन राऊत व बारामती, दौंड रेस्क्यू टीम यांच्या मदतीने सकाळपासून अथक प्रयत्नातून रेस्क्यू टीम यांच्या माध्यमातून विहिरीत पडलेला कोल्हा व मण्यार या दोन्ही वन्य प्राण्यांना जीवदान मिळाले. हे प्रयत्न सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न चालू होता.
बारामती व दौंड रेस्क्यू टीम यांच्या मदतीने अखेर त्यांना दुपारी चार वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या आदिवासात सोडून दिले.या रेस्क्यू साठी प्रयत्न करण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब चे एडवोकेट सचिन राऊत व इंदापूर तालुका वन विभागाचे बागडे साहेब व त्यांची सर्व टीम यांनी मदत करून या वन्य प्राण्यांना जीवदान दिले. यावेळी रेस्क्यू टीम चे नचिकेत अवधानी, श्रेयस कांबळे, प्रशांत कौलकर, ऋषी मोरे व मनसेचे राजू भोंग यांचे विशेष सहकार्य लाभले.