नगराध्यक्ष सुर्यवंशी यांनी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करुन शहराच्या वैभवात भर पाडली – खा. चिखलीकर
गोविंद पवार / नांदेड
लोहा नगर पालिका प्रांगणात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, कांग्रेस मा. जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, अविनाश भोसीकर, मनोहर भोसीकर, विठ्ठलराव शेटकर, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, मा.जि.प.सदस्य हंसराज बोरगावकर, मारोतराव पाटील बोरगावकर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कराळे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर, नरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना खा.चिखलीकर म्हणाले की नगर पालिका निवडणुकीत जो जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला होता. त्या जाहीरनाम्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दिड कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला, लिंबोटी धरणातून कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्य शासनाकडून लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा नगर पालिकेत अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला, मुस्लिम समाजातील कब्रस्तानात विविध विकास कामे, लिंगायत स्मशानभूमी, बौद्ध विहारासाठी विविध विकास कामांसाठी दिड कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला, नगर पालिका ईमारत उभारणी यासह शहरातील रस्ते, नाली, स्टेट लाईट, सभामंडप यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला. लोहा शहरातील जनता ही महापुरुषां सन्मान करते ज्यांनी शहरातील चौफेर विकास करुन शहराच्या वैभवात भर पाडली. नगराध्यक्ष व सर्व टीमचे अभिनंदन करून खा.चिखलीकरांनी पुढील राजकीय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
लोहा शहरातील जनतेला निवडणुकीच्या वेळेस दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध, लिंबोटी धरणातून शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना, बौद्ध विहार, मुस्लिम कब्रस्तान, नगर पालिका ईमारत उभारणी, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा यासह शहरातील विविध विकास कामे करण्याची संधी शहरवासियांनी मला दिली हे मी माझे भाग्य समजतो व शहरवासियांच्या कायम रुग्णांत राहु इच्छीतो – नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी…
चिखलीकरांच्या फेसबुक समर्थकांची गोची ?
फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी शहरात केलेल्या विकास कामाची टक्केवारी नियुक्त अशी थट्टा उडवली जायची लोकनियुक्त ला टक्केवारी नियुक्त अशा विविध उपमा दिल्या जायच्या अशा फेसबुक समर्थकांची खा.चिखलीकरांनी लोहा नगर पालिका प्रांगणात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या पाच वर्षांतील कामाची प्रशंसा करून नगर पालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यामुळे चिखलीकरांच्या फेसबुक समर्थकांची चांगलीच गोची झाल्याची चर्चा नगर पालिका प्रांगणात सुरू होती.