गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाच्या नांदेड जिल्ह्यात नियुक्त्या जाहीर झाल्या असुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार , पक्षाचे मुखपत्र दैनिक सामन्यातुन नियुक्त्या जाहीर झाल्या असुन यामध्ये चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांची लोहा तालुका ( दक्षिण ) तालुकाप्रमुखपदी तर खंडू पाटील पवार यांची लोहा तालुका शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदू ऱ्हदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार तळागाळापर्यंत जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व शिवसेनेचे ब्रिदवाक्य ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण या शिवकवणीला व बाळासाहेबांच्या विचारांना आपण पुढे घेऊन जाल आतापर्यंत आपण विविध संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली या कार्याची दखल घेत आपली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुकाप्रमुख व शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे…
या निवडीबद्दल शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ दादा पवार, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सह – संपर्कप्रमुख मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हाप्रमुख माधवराव पावडे, लोहा विधानसभा प्रमुख साहेबराव काळे, विधानसभा समन्वयक सुरेश पाटील हिलाल, मा.जि.प.सदस्य विठ्ठलराव शेटकर, बालाजी परदेशी, सरपंच बालाजी पाटील पवार हिप्परगेकर, राम पाटील पवार, गजानन मोरे, पंडित पाटील फाजगे, पांडुरंग लोंढे, सह तालुकाभरातुन आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.