दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर (माढा): दिनांक ११/२/२०२४ रोजी नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११४ रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले आहे…
सध्या आपल्या देशात व राज्यात रक्ताचा तुटवता भासत असल्याची माहिती सोशल मीडिया टीव्ही चॅनल वृत्तपत्रातून तसेच काही संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून समजल्यानंतर तसेच राज्यात रुग्णालयाकडून मोठया प्रमाणात रक्ताची मागणी होत असल्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून देखील रक्तदान करण्याचे आव्हान नेहमी करण्यात येत असते या सर्व गोष्टीचा विचार करून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या नरसिंह प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ११ फेब्रुवारी २०२४ (वार रविवार) या दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून लोकांना रक्तदान करण्यासाठी आव्हान केले होते नरसिंह प्रतिष्ठानच्या आव्हानाला प्रतिसाद देत लोकांनी भरभरून रक्तदान केले.. नरसिंह प्रतिष्ठानची रक्तदान शिबिर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झाल्याने सर्वच स्तरातून नरसिंह प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे.. *नरसिंह प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरज गायकवाड यांच्याकडून सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले व रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.असे समजून यापुढे देखील असेच उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच जमा झालेल्या रक्ताच्या पिशव्या कुर्डुवाडी ब्लड सेंटर यांना सुपूर्द करण्यात आल्या यावेळी नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.