50 ते 60 बैलांचा दररोज होतो सराव….
दैनिक चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी गजानन ठोके
ग्रामीण भागातील लोकांच्या आवडीचा व करमणुकीचा खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीस मागील काही वर्षांपूर्वी कोर्टाने बंदी आणली होती परिणामी बैलगाडा शर्यती पूर्णपणे बंद झाल्या होत्या परंतु काही दिवसांपूर्वी कोर्टाने योग्य ती बंधने घालून बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने बैलगाडा मालकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे व गावोगावी शंकर पटाचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे परिणामी चांगल्या धावणाऱ्या बैलांना चांगलीच मागणी वाढली आहे ग्रामीण भागातील तरुणांना बैलगाडा शर्यतीचे वेध लागल्याने आता गावोगावी पुन्हा एकदा भिरर चा आवाज गावोगावी घुमू लागला आहे
पैठण तालुक्यातील मौजे कोळी बोडखा येथील वयोवृद्ध लोकांपासून ते लहान मुलापर्यंत सर्वांना बैलगाडा शर्यतीची गोडी लागली पूर्वी एकही शर्यतीची बैलजोडी नसलेल्या या गावात आज घरोघरी शर्यतीचे जातिवंत बैल पाळले जात आहे या एकाच गावात तब्बल शंभरहून अधिक लहान मोठे बैलशर्यतीसाठी येथील लोकांनी योग्य चांगला खुराक व दररोज सराव घेत बैलगाडा शर्यतीसाठी बैलांना तयार केले आहे विशेष म्हणजे या गावातील शर्यतीचे बैल महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यतीत आपले नाव व बक्षीस मिळवत आहे रोज कुठे ना कुठे बैलगाडा शर्यत आयोजित केलेली असल्यास कोळी बोडखा या गावातील गाडा मालक त्या शर्यतीत आपल्या बैलांना घेऊन सहभागी होतात व तसेच गाव शेजारील मैदानात दररोज सकाळी या बैलांचा सराव घेण्यात येतो हा सराव बघण्यासाठी गावातील नागरिक तेथे आवर्जून उपस्थित असतात गावातील तरुणांनाही बैलगाडा शर्यतीची भुरळ पडली असल्याने तेही बैलगाडा शर्यतीस व्यवसायिकदृष्ट्या बघता व छंद म्हणून यात सहभागी होत आहे
संपूर्ण गावातही सर्वत्र बैलगाडा शर्यत कुणाचे बैल जास्त पळाले कुणाचे बैल भारी शंकर पट कधी आहे याच गोष्टी पारावर लोक करीत असतात एकूणच या गावात बैलगाडा शर्यतीचे बैल असल्याने येथील बैलाचे व्यापारी बैलगाडा मालक बैलगाडा चालक यांनाही रोजगार मिळू लागला आहे एकूणच कोळी बोडखा गाव जणू बैलगाडा शर्यतीचे केंद्र बनले आहे…