दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
सोलापूर (माढा):सालाबाद प्रमाणे याही वर्षी नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली….
यावेळी नरसिंह प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनाथ व गरजू लोकांना मोफत घरपोच अन्नदान करणाऱ्या श्रीमती शिला भारत पाटील, आदर्श शिक्षक म्हणून जनता विद्यालयाचे प्राध्यापक डी. बी गायकवाड सर, शिवविचार प्रतिष्ठानच्या माध्यमातून ह. भ. प बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीसाठी मोलाचे कार्य करणारे व जनजागृती करणारे श्री. विजय बापू खटके, गुणवंत विद्यार्थी म्हणून सई बालाजी लोंढे व आदर्श अमोल महाडिक यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवगर्जना, भाषण व पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा पराक्रम सांगणारे लहान वक्त्यांचा देखील सन्मान करण्यात आला यामध्ये शौर्या समाधान जाधव, सई तेजस निंबाळकर, कार्तिकी गणेश शिंदे, श्रेया चिंतामणी पवार, अमृता विनायक पवार, पृथ्वीराज गणेश शिंदे, यश सतीश पवार, अथर्व विनायक पवार, वैष्णवी विष्णू जाधव यांनी उत्कृष्ट रित्या सादर केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.