दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):हर्षवर्धन पाटील यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत मार्गदर्शन करीत इंग्रजीचा तणाव न घेण्याचा सल्ला देत दिला मानसिक आधार
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विभागाची इयत्ता 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्याशी परीक्षेसंदर्भाने संवाद साधत इंग्रजी विषयाचा तणाव न घेण्याचा सल्ला देत त्यांना मानसिक आधार दिला.यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोडवण्यासाठी आलेल्या पालकांना देखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे स्वागत करीत विद्यार्थ्याप्रती पालकांना निश्चिंत राहण्यासाठीचा आधार दिला. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत तणावमुक्त राहत हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आशीर्वाद घेत ते आनंदी वातावरणात परीक्षाकक्षाकडे जात होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’माझ्याकडून व संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आनंदी वातावरणात व कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता, प्रसन्न मनाने आपण आपले पेपर सोडवावेत. आज इंग्रजी विषयाचा पेपर असून हा पेपर महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी असले तरीसुद्धा आज हे विद्यार्थी या विषयात क्रमांक एकचे यश संपादन करीत आहेत.शैक्षणिक साहित्याच्या संदर्भाने तसेच कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास प्राचार्य, उपप्राचार्यांच्या माध्यमातून आपणास सहकार्य केले जाईल. पालक वर्गाचे मनापासून धन्यवाद. पालक वर्गाचे आपल्या पाल्यावर योग्य लक्ष असणे आवश्यक आहे.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी ,संचालक पराग जाधव , नगरसेवक कैलास कदम ,माजी नगरसेवक शेखर पाटील, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे , कार्यालयीन अधीक्षक अभिमन्यू भंडलकर , सामाजिक कार्यकर्ते दत्ता पांढरे , महादेव पांढरे , सागर गानबोटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षेकरिता जाण्यासाठी सहकार्य केले.