दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी प्रवीण पवार र्दौड- 9923531092
पुणे दि.२६- दौंड रेल्वे हद्दीतील गेल्या ६० वर्षापासून घरे बांधून राहत असलेल्या गरीब दलित अल्पसंख्या झोपडपट्टी वासियांचे आहेत त्या जागेवर कायमस्वरूपी शासनातर्फे घरे बांधून कायमस्वरूपी करावी किंवा केंद्र अथवा राज्य सरकारने शासकीय जागेवर प्रधानमंत्री आवास योजना खाली कायमस्वरूपी पुनर्वसन करावे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांची तर घोषणाच आहे की प्रत्येक भारतीयांना हक्काचे स्वतःचे घर असावे व आमचे सरकार गरिबांना मोफत घर देण्यास प्रतिबंध आहे दौंड शहरातील नगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीतील घरे पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना राबवून मोफत अथवा माफक दरात घरे उपलब्ध करून द्यावी यासाठी दौंड शहर झोपडपट्टी वासियांनी सोमवार दिनांक २६- २ -२०२४ रोजी दुपारी.12 वा. पुणे स्टेशन ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यातआला या यावेळी झोपडपट्टी अध्यक्ष सुरक्षा दल नागसिंगजी धेंडे, आरपीआयचे पुणे जिल्हा संघटक भारत सरोदे, बहुजन रयत परिषदेचे बहुजन अध्यक्ष आबा वाघमारे, यांच्या नेतृत्वाखाली. हा मोर्चा नेण्यात आला या मोर्चाला झोपडपट्टी वाशी महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुरज सरोदे, सुधीर वाघमारे, रूपेश पवार,आकाश शिंदे, आशिष उबाळे, प्रशांत शिंदे, समीर शेख , प्रबोधन धेंडे, कुणाल शिंदे, सागर त्रिभुवन, प्रतीक सरोदे, निखिल कांबळे, आकाश पाळ,सूरज जाधव, आकाश कांबळे,हे सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी झोपडपट्टी अध्यक्ष नागसेन जी धेंडे, आरपीआय नेते. भारत सरोदे, बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष.आबा वाघमारे, यांनी आपल्या भाषणातून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आम्हाला या सरकारकडून कुठली मदत न मिळाल्यास आम्ही सर्व झोपडपट्टी वासी सरकारला सरकारची जागा दाखवून देऊ व झोपडपट्टी वासियांना न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल…