दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- सकल मराठा समाज तरोडा खुर्द आयोजित आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सकाळी अकरा ते एक या दरम्यान रास्ता रोको करण्यात आला . सदरील रस्ता रोको मध्ये कुठल्याही शैक्षणिक विद्यार्थ्यांची किंवा कुठल्याहर् हॉस्पिटलच्या पेशंटची कसल्याही प्रकारची गैरसोय झालेली नसून अतिशय शांतपणे गरजवंत मराठ्यांचा लढा आज रोजी पार पडला आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांना जो आदेश दिला होता त्या आदेशानुसार आम्ही तरोडा खुर्द वाशी यांनी शांततेत आणि शिस्तीत हा रास्ता रोको यशस्वीपणे पार पाडला. रस्ता रोको मध्ये माननीय भाग्यनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांची देखील आम्हाला सहकार्य केले आणि आम्ही देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन कुठल्याही प्रकारच्या गालबोट न लागता यशस्वीरित्या आंदोलन पार पाडले. सदरील आंदोलनामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून आम्ही सर्वांनी रस्त्यावर बसून सरकारची मराठ्यांवरती असलेली व्देष भावना याच्यावरती नाराजी व्यक्त केली आणि पुढील आदेश येई पर्यंत आम्ही रास्ता रोको थांबवलेला असून आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो सकल मराठा समाजाला मान्य असेल आणि या रस्ता रोको मध्ये सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व माननीय भाग्यनगर पोलीस स्टेशनचे वाघ साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाला सहकार्य केले आंदोलन…