लोहा : – कलंबर येथे शिवमुद्रा जनकल्याण सेवाभावी संस्था व शिवमुद्रा मिञ परीवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व शिवचरित्र वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तर या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उस्माननगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गाडेकर गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले .
या रक्तदान शिबीराला परीसरातील युवावर्ग व शिवप्रेमीनी ग्रामीण भागात चांगला प्रकारे प्रतिसाद देत 50 जणांनी रक्तदान केले तर परीसरातील शिवभक्तांना शिवचरित्र वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी आयोजक नंदाजी पाटील इंगळे , शिवमुद्रा मित्र परिवाराचे सदस्य नरेश पाटील घोरबांड व श्री पाटील ताटे, बालाजी सवरते विकी घोरबांड,शिंदे हनुमंत, काठीराम घोरबांड,रामेश्वर कोटेवड,श्रीकांत इंगोले,गणेश पांचाळ,राजेश कदम,नारायण कदम, ओमकार देवणे,शेख अन्सार, माधव घोरबांड, संभाजी मुळे,मारोती वर्ताळे,माधव ताटे,कालेश्र्वर घोरबांड,प्रवीण घोरबांड,वैभव येवले,बालाजी पाटील कपाळे,प्रताप पाटील वाकडे,गोविंद पाटील वडजे, योगेश कल्याणकर, आदींनी सहकार्य केले.