दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळदरी येथील सहशिक्षक श्री डाकोरे सर यांनी गेल्या आठ वर्षापासून जिल्हा परिषद पिंपळदरी येथिल शाळेमध्ये त्यांनी आपली सेवा केली. त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव या ठिकाणी पदोन्नती होऊन बदली झाली. त्यांनी केलेली आठ वर्षाची सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांचं मोलाचे योगदान आहे पिंपळदरी येथील गावकरी मंडळीं तर्फे त्यांना निरोप देण्यात आला . त्यानिमित्त निरोप समारंभातील कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष देवराव पाटील जाधव सरपंच, उपाध्यक्ष संजय शंकर पा.जाधव शालेय समितीचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे सुभाष लक्ष्मण पा. जाधव शालेय समितीचे उपाध्यक्ष तसेच माजी सरपंच बालाजी पाटील जाधव ,उपसरपंच कोंडीबा पाटील जाधव ,माजी सरपंच हरी पांचाळ तसेच इतर गावकरी मंडळी उत्तमराव पाटील जाधव, बालाजी पाटील जाधव ,कामाजी पाटील जाधव, केरबा पाटील जाधव, गोविंद पाटील जाधव, आनंदराव पाटील जाधव, मारोती पाटील भोंग, विठ्ठल पाटील जाधव, साईनाथ हरी पाटील जाधव, गोविंद पाटील पावडे ,प्रभाकर कांबळे ,रामा कांबळे तसेच शाळेतील विद्यार्थी व इतर गावकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री ढाले सर व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप माधव आनंदराव पाटील जाधव यांनी केले आहे…