दैनिक चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी गजानन ठोके
गेल्या काही दिवसापासून पैठण तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असतानाच आता जनावर चोरीचं संकटही शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेला आहे शेतीला जोड धंदा म्हणून काही शेतकरी शेळी पालन करतात परंतु अलीकडच्या काळात शेळ्यासह जनावरेही चोरीच्या घटना वर्षभर घडत असल्याने पशुपालक चिंतेत सापडला आहे
पैठण तालुक्यातील कोळी बोडखा गावालगतच्या या वस्ती येथे राहणारे शेतकरी इम्रान नुरा सय्यद अनेक वर्षापासून शेळी पालन व्यवसाय करत असल्याने त्यांनी शेळ्यांसाठी आपल्या घराच्या शेजारीच पत्र्यांच्या शेडचा गोठा उभारलेला आहे नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या शेळ्या त्या गोठ्यात बांधलेल्या होत्या.
दिनांक 29 फेब्रुवारी रोजी रात्री घरातील सर्वजण झोपी गेले असता मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरांनी घराजवळ असलेल्या शेळ्याच्या गोठ्याची दोन पत्रे विस्कटवून शेळ्याच्या गोठ्यात बांधलेली दोन मोठाली बोकड चोरी करून फरार झाले आहे.
सकाळी इमरान सय्यद हे आपल्या शेळ्याच्या गोठ्यात गेले असता त्यांना शेड ची दोन पत्रे विस्कटलेली दिसली त्यांनी नीट पाहणी केली असता त्यांना शेळ्याच्या कळपातील दोन मोठे बोकड चोरी झाल्याचे आढळून आले तात्काळ त्यांनी ही बातमी आपल्या नातेवाईकांसह गावकऱ्यांना दिली व पोलिसांनाही कळवले पाचोड पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार अंदाजे वीस हजार किंमतीचे बोकड चोरी झाल्याचे म्हटले आहे इम्रान सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पाचोड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास जमादार राऊत व कॉन्स्टेबल बागवान करत आहे…