दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड जिल्हातील सर्व कार्यालयातील महिला अधिकारी, महिला कर्मचारी, महिला तलाठी, महिला मंडळ अधिकारी,महिला शिपाई, महिला कोतवाल तसेच तालुक्यातील महिला पोलिस पाटील यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता.जागतिक महिला दिनानिमित्त दि.११/०३/२०२४ सोमवारी रोजी दुपारी तीन वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.तसेच आरोग्य तपासणी,बीपी ,शुगर,रक्त तपासणी गुरू गोविंदसिंग हाॅस्पीटल नांदेड येथे आरोग्य तपासणी करण्यात आली.अशी माहिती सिध्दनाथ ता.जी.नांदेड येथिल महिला पोलिस पाटील सौ.सुनिता व्यंकटी आवातिरक यांनी दै चालु वार्ता ला कळविले आहे…