दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):नवी दिशा नवे उपक्रम’ या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळा२०२४ दिनांक ९ मार्च २०२४ रोजी राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सहकारनगर ,पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये शंभर उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच त्यांनी सादर केलेल्या विविध नवोपक्रमांच्या “शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे” या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. याप्रसंगी इंदापूर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा अभंगवस्तीच्या उपक्रमशील शिक्षिका स्वाती सुरेश लोंढे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नं ६ येथील उपक्रमशील शिक्षक सुरेश गोरख लोंढे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नं. १ च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रुक्साना युसुफ शेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचा “स्टॅम्प उपक्रम” या पुस्तकात समाविष्ट आहे. या कार्यक्रमास मा. शुभांगी चव्हाण -उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक पुणे मनपा या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच SCERT चे संचालक राहुल रेखावार साहेब ,सहसंचालक डॉ.शोभा खंदारे मॅडम आणि क्रीडा विभाग प्रमुख ,शिक्षण विभाग पुणे मनपाचे माणिक देवकर साहेब उपस्थित होते.देवराव चव्हाण सर,बळीराम जाधव सर आणि आयुब शेख सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अतिशय शिस्तबद्ध नियोजनात दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला.