पालघर – जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघाचा पेच कायम असून महायुतीबरोबरच महाविकास आघाडीची ही उमेदवार चाचपणी अजून कायम आहे . शिंदे गटाकडून स्टॅंडीग खासदार राजेंद्र गावित तर भाजपचे डॅा . हेमंत सवरा ही प्रयत्नशील आहेत , मात्र वरिष्ठ पातळींवर अजून एकमत झालेल दिसत नाही तर महाविकास आघाडीतही उबाठा शिवसेना गटाकडून माजी जि प अध्यक्षा भारती कामडी यांचे नाव पुढे येत असून कॅांग्रेस पक्षाकडून वझरा व माजी दिवंगत खासदार दामू शिंगाडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांचे ही नाव पुढे येत आहे कॅांग्रेस पक्षाकडून सचिन यांचे वडील पाच वेळा खासदार राहील्याने सचिन शिंगडा हे नाव सर्वपरिचित तर आहेच पण त्यांचा स्वतःचा ही मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे अशातच त्यांनी काल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची भेट घेतल्याने आपली उमेदवारी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे..