
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : स्वप्निल जोशी त्याच्या चित्रपटांमधील अभिनयामुळे तो नेहमी चर्चेत असतो. पण सध्या त्याच्या नव्या गाडीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या मितवा, दुनियादारी, मुंबई-पुणे- मुंबई या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
नुकताच स्वप्नीलने आलिशान गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे फोटो स्वप्नीलने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
स्वप्नील जोशी Jaguar I-Pace ही गाडी घेतली आहे. या गाडीचे फोटो शेअर करून स्वप्नीलने कॅप्शन दिले, ‘बाप्पा मोरया. Jaguar I-Pace ही ईलेक्ट्रीक गाडी घेतली. आज मी खूप आनंदी आहे. स्वप्नीलच्या या पोस्टवर कमेंट करत त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. तसेच रितेश देशमुख, भरत जाधव, सुबोध भावे, सुयश टिळक, अमेय वाघ,भारती सिंह, प्रार्थना बेहरे आणि श्रेया बुगडे या कलाकारांनी स्वप्नीलच्या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.