
दैनिक चालू वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा -अतीदुर्गम भागातील आदिवासी,वंचित,उपेक्षित,दुर्लक्षित गोरगरीब जनतेच्या जीवनात विकासाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी,गोरगरीब आदिवासी बांधवांची मुले देखील आय ए एस व एम पी एस सी पास होऊन उच्च पदस्थ अधिकारी व्हावेत यासाठी मोफत क्लासेस चालवणारे,आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेंचे संस्थापक तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर निलेश सांबरे यांनी मोखाडा नगरपंचायत इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर दि 4 डिसेंबर वार डिसेंबर वार शनिवार रोजी कार्यकर्त्यांच्या भेटी घेत वार्डातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी ग्रामस्थांनी ही त्यांचे मनापासून स्वागत केले.
नुकत्याच जिजाऊ संस्थेच्या जनसेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी निलेश सांबरे यांनी विकासाचा प्रकाश आदिवासी गावपाड्यावरील जनतेच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी मोखाडा नगरपंचायत च्या सत्तेच्या चाव्या जिजाऊ च्या हातात द्या असे आवाहन केले.त्याला नगरपंचायत हद्दीतील मोखाडावासियांनी साद देत असल्याचे चित्र या भेटीदरम्यान पहावयास मिळत आहे.मोखाड्यातील 25 ते 30 टक्के आदिवासी बांधव पोटासाठी स्थलांतर करतो ही दुर्दैवी बाब असुन आदिवासी बांधवाना स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करण्यात येथील सर्वपक्षीय नेतृत्व मागे पडले अशी टिका त्यांनी जिजाऊ जनसेवा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी केली.आता फक्त एकच ध्यास मोखाड्याचा विकास आशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे.