
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
माधव गोटमवाड
लोहा शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे अपघात व वहातुक कोंडी लक्षात घेवून नगरपालिका प्रशासणाने महामार्गावरिल अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आली, महामार्गावरिल अतिक्रमण हटवल्यामुळे नागरीकातुन समाधान व्यक्त होत आहे परंतु,भाजीपाला विक्रेत्यावर मात्र उपासमारीची वेळ आली असुन, भाजीपाला मार्केट साठी आडबाजुला जागा देण्यायेवजी मुख्यरस्त्यालगत जागा देण्याच्या मागणी साठी न.पा. सभाग्रहातील जेष्ट नगरसेविका राहिबाई खिल्लारे यांच्याकडे महिला भाजीपाला विक्रेत्यानी भेट घेवून भाजीपाला विक्रीसाठी मुख्यरस्त्या लगत जागा देण्याची मागणी केली आहे.
लोहा नगर पालिका प्रशासणाच्या वतीने लोहा शहारातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ वर वहातुकीची कोंडी होत असल्याने व अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत असल्याने व अपघात टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासणाने दि.२१ नोव्हेंबर पासुन शहरातील महामार्गा लगत असलेले अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आली रस्त्या लगत असलेल्या छोटे मोठे व्यापारी ,भाजीपाला विक्रते, गाडेवाले यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली परंतु भाजीपाला मार्केट आडबाजुला झाल्यामुळे ग्राहक होत नसुन हजारो रुपयाच्या मालाची नासाडी होत असुन दररोज हजारो रुपयाचे नुकसान होत आहे. आज घडीला भाजीपाला विक्रेत्यावर उपास मारीची वेळ अली आहे, सदरिल भाजीपाला विक्रेत्याना मुख्यरस्त्या लगत जागा देण्यात यावी या मागणी साठी भाजीपाला विक्री करणाऱ्या महिला शिष्टमंडळाने न.पा.सभाग्रहातील जेष्ट नगरसेविका राहीबाई खोब्राजी खिल्लारे यांची भेट घेवून आडचण सोडवण्याची मागणी केली,नगरसेविका राहिबाई खिल्लारे यांनी तात्काळ लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला व नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी येत्या काही दिवसात कायमस्वरूपी भाजी मार्केट संदर्भातील योग्य ठिकाणी स्थलांतरीत करून देण्या संदर्भात शब्द देण्यात आला त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बालाजी खिल्लारी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधराव महाबळे, केतन खिल्लारे भैयासाहेब येवले,सिकंदर शेख,माधव भोळे,भाजीपाला विक्रते वडजे, गोडबोले,राऊत यांच्या सह व्यापारी उपस्थिती होते.