
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : विक्कीपेक्षा वयाने मोठी आहे कतरिना विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे. कॅट विकपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. कतरिना 38 वर्षांचे तर विकी 33 वर्षांचा आहे.त्यामुळे कतरिनाचे नाव पतीपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत समिल होणार आहे. कतरिनाचे बॉलिवूडमधील कारर्कीदही विक्कीपेक्षा मोठी आहे. कतरिनाने 2003 मध्ये बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये कॅट जवळपास 18 वर्षे काम करतेय. तर विक्की कौशलने 2012मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री केली.कतरिनाचे नेटवर्थ
बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आणि दमदार अभिनेता विक्की कौशल याच शाही लग्नाची राजस्थानमध्ये जोरदार तयारी सुरु आहे.रिपोर्टनुसार कतरिना आणि विक्की लग्नाच्या विधींसाठी राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. 9 डिसेंबरला सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. विक्की कौशल आणि कतरिना कैफ बराच काळ एकमेकांना डेट करत होते, पण त्यांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी अधिकृत कबुली दिली नाही.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार कॅटचे नेटवर्थ 224 कोटी आहे ती एका सिनेमासाठी 11 कोटींचे मानधन घेते. याशिवाय कतरिनाकैफ ‘के ब्युटी’ या ब्रँडची मालकीण आहे. यासोबतच कतरिनाने न्याकामध्ये 4 कोटी रुपये गुंतवले होते, त्याचे तिला आता 24 कोटी रुपये मिळाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफकडे 3-4 लक्झरी कार आहेत. या यादीमध्ये रेंज रोव्हरपासून ऑडीपर्यंतचा समावेश आहे.विक्कीचे नेटवर्थ
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार विकीचे नेटवर्थ 25 कोटी रुपये आहे, तो एका सिनेमासाठी 3 ते 4 कोटी रुपाये घेतो. विकीला ब्रँड एंडोर्समेंटसाठी 2-2.5 कोटी रुपये मिळतात. विक्कीच्या करिअरला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामुळे कलाटणी मिळाली. .