
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी: लोहारा तालुक्यातील माकणी येथे दिनांक 22/12/2021 रोजी बी. एस. कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय व गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रथमता रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एच. एन.रेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अतुल बिराजदार यांनी रामानुजन यांचे गणितातील योगदान याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रा. प्रवीण मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. अंजली मुसांडे- मोहिते यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. अनिल गाडेकर, प्रा. डॉ. एस. डी. मुंगळे, प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड, प्रा. डॉ. संजय बिरादार प्रा. डॉ. वैभव पतंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.