
दैनिक चालु वार्ता
माकणी प्रतिनिधी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा :-विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी . अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा मानलं जाणाऱ्या शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीच्या सुधारित प्रस्तावाला अखेर दोन्ही सभागृहातून एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधान परिषदेत सुधारित शक्ती विधेयक मांडलं. या विधेयकारवर सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेल्या सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
महीलांवरील अत्याचाराला थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार ने शक्ती विधेयक मंजूर करून महीलांना मोठा आधार दिला आहे.महिलांवरील व चिमुकल्यांवरील होणारे अत्याचार या विधेयकामुळे थांबुन महीला सशक्तीकरणालाही हातभार लागणार असल्याचा विश्वास महीलांमध्ये शक्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांचे जिजाऊ ब्रिगेड लोहारा च्या तालुकाध्यक्षा रंजनाताई हासुरे यांनी स्वागत केले आसुन महीलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा शक्ती विधेयकामुळे मिळणार आहे या कायद्याचे महत्त्व ओळखून जिजाऊ ब्रिगेड अनेक वेळा केंद्र आणि राज्य शासनाला शक्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सातत्याने मागणी केली होती.हिवाळी अधिवेशनात एकमताने मंजूर मिळाल्याचे स्वागत जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे कार्याध्यक्षा प्रतिभाताई परसे कोशाध्यक्ष मेघाताई जाधव शितल ताई गोरे यांनी विधायकाचे स्वागत केले .