दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई– : अंबाजोगाई – लातूर रोडवर बर्दापूर पाटी नजीक कार, पिकअप टेम्पो आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात शनिवारी दि.09 रात्री 11.30 वाजता झाला. भुनम्मा सायन्ना शिरपे वय 39 असे अपघातात मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते घाटनंदूर येथील शाळेत शिक्षक होते.
भूनम्मा सायन्न शिरपे हे शनिवारी रात्री दुचाकीवरुन MH 44 L 7152 लातूरहून अंबाजोगाई कडे येत होते बर्दापुर पाटीच्या पुढे आले असता सिफ्ट डिझायर कार MH 20 BY 9787 आणी पिकअप टेम्पो सोबत त्यांच्या दुचाकीचा तिहेरी अपघात झाला.या अपघातात भुनम्मा शिरपे जागीच ठार झाले तर स्विफ्ट डिझायर चा चालक अशोक कदम रा.आपेगाव व रोहीत कुचेकर रा.परळीवेस हे दोघे गंभीर जखमी झाले असुन जखमीना स्वा रा ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.