दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
उदगीर :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य, लातूर जिल्हा युवक कुणबी-मराठा मंडळ उदगीर-अतनूर शाखेच्या वतीने दि.११ मार्च वार शुक्रवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड नाकाचे शाखा प्रबंधक अभिजीत अहिवले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय सावरे-पाटील हे होते. यावेळी शाखा प्रबंधक अभिजीत अहिवले यांनी कोरोना काळात बँक ग्राहकांना मार्गदर्शन करीत नागरिकांची भीती कमी केली होती.
शिवाय बँक ग्राहकांना योग्य असे मार्गदर्शन करीत आर्थिक देवघेव उत्तम व उत्कृष्टपणे सांभाळत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड नाका बँकेचा कारभार शाखा प्रबंधक अभिजीत अहिवले यांनी सांभाळला. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतीचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, कॅशियर सौ.जयश्री कुलकर्णी, चंद्रप्रकाश साधवानी आदी उपस्थित होते.