दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- मराठा सेवा संघा च्या माध्यमातून अनेक दशकापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे संभाजी ब्रिगेड ऊर्जावान कार्यकर्ते श्याम पाटील कुशा वाडीकर यांचे आज पहाटे तीन वाजताच्या दरम्यान अपघाती दुर्दैवी निधन झाले. ही घटना अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. श्याम पाटील अत्यंत कष्टातून व विचाराच्या सामर्थ्यावर नावारूपाला आलेल नाव. सध्या ते संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, त्यांच्या अकाली जाण्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, परिवार व चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे.
काल लग्न सोहळा निमित्त नाशिक कडे गेले होते. नाशिक वरून रात्री परत येताना मध्य रात्री च्या सुमारास गेवराई जवळ अपघात झाला. झोपेत गाडी चालवत असताना डिवायडरला धडकून हा अपघात घडला व त्यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. श्याम पाटील स्वत: गाडी चालवत होते. खेडेकर साहेबांसह अनेकांनी रात्रीचा प्रवास करू नका, असे सांगूनही कार्यकर्ते ऐकत नाहीत .कृपया रात्रीचा प्रवास करून अकाली अपघातात जीवन संपवू नका, ही विनंती.त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे.
समाजाला त्यांची सामाजिक बांधिलकी नेहमी प्रेरणा देणारी होती. निस्वार्थ भावना मनमोकळा स्वभाव लहाना पासून थोरा पर्यंत वागताना-बोलताना अंगी नम्रपणा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. गेली तीन वर्षापासून ते संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी असंख्य दुर्लक्षित प्रश्न सोडवण्याचे काम केली आणि संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजिक उपक्रम देखील हाती घेत होते. त्यांचं निधननाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अतिषय कणखर, कष्टाळू व धडाडीचा प्रामाणिक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता,नेता,मित्र आपल्यातून काळाने हिरावून घेतला. अतिषय दुख:द घटना. श्याम पाटील यांच्या अकाली निधनामुळे चळवळीची सर्वार्थाने न भरून निघणारी हानी झाली आहे.आई जिजाऊ त्यांच्या कुटुंबीयांना व मित्र परिवारांना या दु:खातुन सावरण्याचं बळ देवो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना.संभाजी ब्रिगेड परिवारातर्फे भावपुर्ण शिवांजली. निःशब्द…. अशी भावना संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड मनोज आखरे यांनी व्यक्त केली आहे.
संभाजी ब्रिगेड चे निष्ठावंत कार्यकर्ते.. माझे अत्यंत निकटवर्ती, विश्वासू सहकारी शाम पाटील ह्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झाले. पहाटे 4 वाजता ही घटना समजली. त्यांच्याच फोन वरून मला पहाटे फोन आला आणि नेहमीचा भाऊ जय जिजाऊ शाम पाटील हे न ऐकू येता ही अत्यंत वेदनादायी बातमी समजली. संभाजी ब्रिगेड गेवराई, बीड आणि नांदेडच्या सर्व सहकाऱ्यांना निरोप दिला. त्यांनी तातडीने हालचाली केल्या परंतु यश आले नाही.. रात्रीचे प्रवास टाळा हे साहेब गेली अनेक वर्ष आपल्याला सांगत आहेत.. संभाजी ब्रिगेड ने एक ढाण्या वाघ आज गमावला हे मात्र दु:ख कायम राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली…. अशी भावना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.
दुर्दैवी निधन !भावपूर्ण श्रद्धांजली.. संभाजी ब्रिगेड चे ऊर्जावान कार्यकर्ते श्याम पाटील कुशा वाडीकर यांचे आज पहाटे तीन वाजता अपघाती दुर्दैवी निधन झाले. ही घटना अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. श्याम पाटील अत्यंत कष्टातून व विचाराच्या सामर्थ्यावर नावारूपाला आलेला नाव. संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, त्यांच्या अकाली जाण्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, परिवार वचळवळीची खूप मोठी हानी झाली आहे. गेवराई जवळ झोपेत गाडी डिवायडरला धडकून हा अपघात घडला. श्याम पाटील स्वतः गाडी चालवत होते.
खेडेकर साहेबांसह अनेकांनी रात्रीचा प्रवास करू नका , असे सांगूनही कार्यकर्ते ऐकत नाहीत . कृपया रात्रीचा प्रवास करून अकाली अपघाती जीवन संपू नका ही विनंती केवळ 42 व्या वर्षी श्याम पाटील यांचे अपघाती जाणे धक्कादायक आहे . शिवधर्माचा विचार गावखेड्यात पोहोचवण्यात श्याम पाटील यांचा खूप महत्त्वाचा सहभाग होता. मराठा सेवा संघ सर्व कक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत. अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्यास भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते तथा विचारवंत गंगाधर बनबरे यांनी व्यक्त केली आहे.