दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :लिंगायत समाजाचे धर्मगुरू वीरशैव जगतज्योती संत बसवेश्वर महाराज यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटूंबात बसवेश्वरांचा जन्म झाला.सामान्यतः त्यांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाल्याचे मानले जाते.म्हणून ह्या दिवशी लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करतात.
जयंतीचे औचित्य साधून अंजनगाव सुर्जी येथील सुर्जी भागात संत बसवेश्वरांचे अनेक अनुयायी असल्यामुळे हडगरपुरा येथे संत बसवेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ह्यावेळी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण लिंगायत समाजातील जेष्ठ नागरिक भाऊरावजी कोने व उमेश गायके यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख उपस्थितीत प्रवीण पटूकले,किशोर यावतकार,सतीश कोने,अनिल लोणकर,सुनील पटूकले हे होते तर राहुल रोठ, विलास हुस्कल,निलेश दुगणे,कैलास हुस्कल,आशिष गायके,संदीप पटूकले,राहुल सरोदे,राजेश रोठ,चेतन खंडारे,राहुल मोडके,प्रदीप पटूकले,अमोल रोठ,प्रफुल्ल लोणकर,सचिन यावतकार,राज मानेवर आदीं समाजातील युवांच्या आयोजन तसेच पुढाकाराने बसवेश्वर महाराज जयंती उत्सव मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्साहात संपन्न झाला.