दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉगनने आयपीएल टायटल विजेत्या हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. वॉगनने हार्दिकच्या कॅप्टन्सीची ट्वीट करून स्तुती केली आहे.
हार्दिक पांड्याने आयपीएल फायनलमध्ये गोलंदाजीत 3 विकेट आणि फलंदाजीत 34 धावा करून गुजरात टायटन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट राखून पराभव केला.
गुजरात टायटन्सच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉगनने ट्विट केले. ‘नवख्या फ्रेंचायजीची दमदार कामगिरी… जर भारताला येत्या दोन वर्षात कर्णधाराची गरज लागलीच तर तो हार्दिक पांड्याच असेल’
सध्या तीनही फॉरमॅटमध्ये भारताच्या नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. त्याने नेतृत्वाची धुरा विराट कोहलीकडून आपल्या खांद्यावर घेतली आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणाऱ्या 28 वर्षाच्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वगुणांचे कौतुक अनेक आजी आणि माजी खेळाडूंनी केले आहे. यात सुनिल गावसकर आणि गुजरात टायटन्सचे मेंटॉर गॅरी कर्स्टन यांचा देखील समावेश आहे.
हार्दिक पांड्याने यंदाच्या हंगामात 487 धावा आणि 8 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात तर गुजरातने राजस्थानला 130 धावात रोखले. त्यानंतर हार्दिकने 34 धावांची महत्वाची खेळी करून गुजरातला विजयी मार्गावर पोहचवले. त्यानंतर शुभमन गिलने 45 तर डेव्हिड मिलरने 32 धावा करत 131 धावांचे आव्हान 18.1 षटकात पार केले.