दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड दि . २६ (प्रतिनिधी ) ७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दि. २२ ते २६ जानेवारी दरम्यान विविध सांस्कृतिक व क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये उदंड प्रतिसाद देत आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदवला . केवळ पुस्तकी ज्ञानच महत्वाचे नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचा बौद्धिक सामाजिक व शारिरीक विकास झाला पाहिजे. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांची शारिरीक व बौध्दिक क्षमतेचा कस ओळखण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. हाच एकमेव उद्देश ध्यानी धरून जिजाऊ ज्ञानमंदिरात दि. २२ रोजी ‘ हळदीकुंकू व आनंदनगरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . त्या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी उदंड असा प्रतिसाद देत जवळपास दिडशेच्यावर आपली दुकाने थाटली. सर्वांनीच आपला व्यावहारिक अनुभव दुसऱ्यादिवसी आपल्या मनोगतातून व्यक्त करून मुळ भांडवल , झालेला नफा व शिल्लक याविषयी आपापल्या वर्गशिक्षकांकडे हिशोब दिला. दि. २३ ते २६ जानेवारी दरम्यान जिजाऊ ज्ञानमंदिरात सांस्कृतिक व क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात लिंबू चमचा , जिलेबी रेस, बेंडूक उड्या ‘ पुस्तक समतोल , चेंडू खोक्यात टाकणे, खुर्ची रेस , स्मरणशक्ती , मडका फोड , फुगा फोड , टिकली लावणे , गाढवास शेपूट लावणे, दोरीवरच्या उड्या , धावणे, तळ्यात मळ्यात , उंच उडी , लांब उडी, कबड्डी , क्रिकेट , खो-खो , तसेच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, शुद्ध लेखन स्पर्धा , गीतगायन स्पर्धा, प्रश्नमंजूषा , चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा ‘ रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा आदी सांस्कृतिक व क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे परिक्षण परिक्षकांकडून अतिशय पारदर्शक पद्धतीने करून त्यांच्या कलागुणांचे योग्य असे मुल्यमापन करण्यात आले. या स्पर्धक विजेत्यास योग्य असे शालेय उपयोगी साहित्याचे बक्षिस म्हणून वाटप करण्यात आले. जवळपास अडीच हजार बक्षिसे वाटप करण्यासाठी दि २६ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस दोन सत्रात बक्षिस वितरण कार्यक्रम घ्यावा लागला. या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सामनाचे पत्रकार सुशिल पत्की बाबुराव मरेवाड , गजानन जमदाडे , शेळके सर, कृषी सहाय्यक दिगांबर शेटवाड जोशी इन्फोटेक चे संचालक जय जोशी सर हे उपस्थित होते. जावेद शेख सर , अँडव्होकेट महेंद्र जोशी सर विस्तार अधिकारी पाटील मुखेडकर , व संचालक जगदीश जोगदंड , मुख्याध्यापक जगदीप जोगदंड , सुधाकर जोगदंड आदीची उपस्थिती होती. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन त्यांचे तोंडभरून कौतुक व अभिनंदन केले. यावेळी आधूनमधून डॉन्स , देशभक्तीपर गीते सादर केल्यामुळे कार्यक्रमाची चांगलीच रंगत वाढली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. शकुंतला गीते मॅडम , सौ वंदना वडजे मॅडम , शायराबानू शेख मॅडम यांनी केले.
स्वागतगीत सचिन सुर्यवंशी सर व विनिता चव्हाण या विद्यार्थीनीने गायीले. उर्वरित बक्षिस वितरण उद्या दि. २७ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. विविध स्पर्धांमध्ये मोठ्याप्रमाणावर सहभाग व अधिकचे बक्षिसे विद्यार्थ्यांनी मिळविल्या मुळे विद्यार्थ्यांत व पालकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.