दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर (प्रतिनिधी) स्वच्छतेचे जनक, मानवता धर्माचे पुजारी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 147 वी जयंती देगलूर शहरातील भटगल्ली परिसरात परीट समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, नगरसेवक प्रशांत दासरवाड, ॲड. विरेंद्र पाटील, मराठी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष श्याम वद्देवार, सामाजिक कार्यकर्ते कैलास येसगे, साधना हायस्कूलचे मुख्याध्यापक यादव बत्तुलवार, भटगल्ली शाळेचे मुख्याध्यापक नामदेव बिरादार, शिवसेनेचे महेश पाटील, संजय जोशी, बालाजी मेलागिरे, भाजपा चे अशोक कांबळे, चीलवरवार सर, चे परीट समाजाचे मराठवाडा सचिव संग्राम हनुमाने देगावकर, संघटक दाऊबे , जिल्हाकार्यध्यक्ष दिगंबरराव तमलुरकर,तालुकाध्यक्ष योगेश जाकरे, ता. संघटक शंकर चटलुरे, शहर अध्यक्ष गजानन दाऊबे, प्रमुख सदस्य मालिकार्जून हनुमाने, मुख्य सदस्य गंगाधर दाउलवार, शिवाजी मुत्तेपवार, यादव मुतेपवार, लक्ष्मण सांगवीकर, दता अजनीकर, शंकर अटकळीकर, महेश वाघमारे, विठल कोंडलाडे, उत्तम दाऊबे, अशोक आदमपूरकर, पपू एस. देगावकर रामलू कंदकुर्ती, गुंडूराम दाऊबे, यासह आदी आदी समाज बांधवानी प्ररिश्रम घेऊन जयंती उत्सव साजरा केला. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना समाजाचे तालुका अध्यक्ष योगेश जाकरे यांनी समाजाचे प्रलंबित मागण्या खासदार आमदार महोदय यांच्यापर्यंत पोहचवून स्मारक व सभागृह उभारण्यासाठी गोजेगावकर पाटील, मोगलाजी शिर्शेटवार यांनी प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली. यासोबतच भायेगाव रोड परिसरातील सभागृहाच्या ठिकाणीं समाजाचे ज्येष्ठ नागरिक व शासकीय सेवेतून सेवा निवृत्त झालेल्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.