दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुक्रमाबाद :
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे नवीनच चालू झालेल्या पोद्दार जम्बो कीड्स प्ले ग्रुप ते नर्सरी सिनीयर केजी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
मुक्रमाबादचे सहायक पोलीस निरिक्षक राजेश आलीवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाला मुक्रमाबादच्या सरपंच सौ.अंजीताताई बालाजी बोधने, उपसरपंच सदाशीव बोयेवार, पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगने, ग्रा.प.सदस्य बालाजी अप्पा पसरगे, बालाजी अप्पा बोधने, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुरेश राचलवार, सचिव सौ.विणा सुरेश राचलवार आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याच्या माध्यमातून ही शाळा नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत नियमितपणे विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना, कल्पकतेला वाव देत असते.
या कार्यक्रमात गणेश वंदना, छत्रपती शिवाजी महाराज, मां तुझे सलाम, मैय्या यशोदा , जलवा,मेरे पापा अशा विविध गीतांवर अभिनव असे आविष्कार प्रदर्शित करण्यात आले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक पालक, लहान-लहान मुले, गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उपक्रमात सहभागी झालेल्या चिमुकल्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहन पर बक्षिसे वितरित करण्यात आली. तद्वतच ती गावातील प्रतिष्ठित व्यापारी अशोक सावकार वट्टमवार, बस्वराज प्रतप्पा खंकरे, गोपनीय शाखेचे पोलीस यादव ईबीतवार, शिवाप्पा वंटगिरे, कैलास येम्पल्ले सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, गोल्ड आणि सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्य शिक्षक आनंद खंडागळे सर, सौ.जयश्री आनंद खंडागळे, सौ.अनिता नागनाथ थळपत्ते, सौ.अंजली कोडगिरे, सौ.सरोज क्यादरकुंटे, गणेश राचलवार, यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर गुरुजणांचे पालकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.सरोज क्यादरकुंटे मॅडम व आनंद खंडागळे यांनी केले तर आभार सौ.अनिता थळपत्ते मॅडम यांनी मानले.