दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी –
कंधार तालुक्यातील बऱ्याच सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सध्या चालू आहे, त्यासोबतच शेकापूर सेवा सहकारी सोसायटी चीही निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्यादरम्यान शेकापूर ग्रामपंचायतीच्या फलकावर नियोजित दिनांकात प्राथमिक मतदार यादी लावण्यात आली होती व सहा दिवसांचा आक्षेप कालावधी ठेवण्यात आला होता त्यादरम्यान संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या तळ्याचीवाडी येथील काही मतदारांनी दि २० /०२/२०२३ रोजी मतदार यादीवर आक्षेप घेतला होता, त्यानंतर दोन दिवसांनी दिनांक २२/२/२०२३ रोजी अर्जावर सुनावणी होती. सदर अर्जावर सुनावणी देण्यात आली व त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे दिनांक २४/२/२०२३ रोजी शेकापुर सेवा सहकारी सोसायटी च्या आक्षेप अर्जाचा निकाल होता तर अर्जदार शिवाजी पाटील मंगनाळे, गोविंद गरजे, एकनाथ गर्जे ,मारुती मंगनाळे, बालाजी तेलंग, ई. मतदार आणि तळ्याची वाडी येथील ग्रामस्थ आज सकाळी कार्यालयात गेले असता कार्यालयाचे मुख्य, सहाय्यक निबंधक श्री डी.ए. मदने यांचे केबिन बंद दिसले, व विचारपूस केली असता कोणत्याही कनिष्ठ अधिकाऱ्याला साहेबांबद्दल माहिती नाही किंवा रजा आहे याची खात्री नाही असे सांगण्यात आले व दुरभाष्य करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे समजले आणि त्याचबरोबर शेकापूर सोसायटीचे सचिव एस के तेलंग हे ही गैरहजर होते.ऐन सुनावणीच्या निकालाच्या दिवशी संबंधित दोनही अधिकारी गैरहजर आहेत याचा अर्थ बेजबाबदारपणा किंवा एक पक्षीय भुमिका आहे आसं निष्पन्न होतं, तर सहकारी संस्थांच्या निवडणुकांबद्दल इतका बेजबाबदारपणा का आणि हे लोकशाहीच्या व्याखेला, जनतेच्या समान अधिकाराला साजेस आहे का असा प्रश्न आज तळ्याचीवाडी येथील मतदारांनी केला तसेच अशा बेजबाबदार आणि कर्तव्य शून्य असलेल्या सचिवाला आणि सहाय्यक निबंधकांना तात्काळ निलंबित करा असा दावा केला आहे.