दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- भारतीय संविधानामध्ये ३४२ कलमान्वये आदीवासी कोळी महादेव जमातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आदिवासीचा दर्जा प्राप्त करुन दिला. मात्र या जमातीच्या लोकांना आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी कोळी महादेव जमातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. मात्र ते मिळत नसल्याने दि.२३ फेब्रुवारीपासून आदिवासी समाजाच्या वतिने कंधार येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
आदिवासी कोळी महादेव
जमातीच्या लोकांचा शैक्षणिक, सामाजिक आर्थिक राजकीय विकास व्हावा यासाठी महादेव कोळी जमातीला आदिवासीचा दर्जा प्राप्त करुन दिला. आदिवासी समाज हा निरक्षर, अज्ञानी व आर्थिकदृष्ट्या कमकुमवत असल्याने या समाजाला जात प्रमाणपत्र काढणे सुलभ व्हावे म्हणून शासनाने महास्वराज्य अभियान राबवून गावस्तरावर शिबीरे घेऊन जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. मात्रस्थानिक महसूल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आदिवासी कोळी महादेव समाज संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेच्यावतीने गोरगरीब, शेतकरी व विद्यार्थ्यांना शिबीरे घेऊन जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत करुन प्रशासनाकडे हजारो अर्ज सादर करुनही महसूल यंत्रणेकडून जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याने २३ रोजी कोळी महादेव समाजाच्या वतीने कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकाळी ९ ते दि.२५/२/२०२३ सायंकाळी १० वाजे पर्यंत असा तीन दिवसाचे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. महादेव कोळी समाजाची दखल घेण्यासाठी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी येऊन दखल घेतली नाही.यावेळी अनेक वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित आदिवासी कोळी कर्मचारी विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री.परमेश्वर गोणारे साहेब , बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री.मनीषभाऊ कावळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष श्री.शिवाभाऊ नरंगले,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.बालाजी चुकलवाड,श्री.मारुती कोठेवाड कलंबरकर , श्री .सत्यपाल पुटवाड , श्री.कैलास कडमपल्ले, श्री .धोंडीराम गडमवाड, श्री.राजु गडमवाड, श्री .शेषराव मिस्त्री शेटवाड , श्री दत्ता मिस्तरी शेटवाड , श्री.मोरोती साहेब गडमवाड , श्री.पुंडलीक शेटवाड, मधूकर तेलवाड माजी सरपंच श्री.कैलाश शेटवाड पेठवडज व अनेक विद्यार्थी महिला पुरुष उपस्थित होते अशी माहिती पेठवडज नगरीचे सामाजिक कार्यकर्ते सोनू तेलवाड यांनी दिली आहे.