दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- लातुर तालुक्यातील खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या लातूर जिल्ह्यातील मौजे .शिवणी खुर्द येथील घटना खाजगी सावकार नाव ज्ञानदेव पंढरी सुडे यांच्यावर अवैध सावकारी करून घेतलेले खरेदीखत दस्त क्रमांक, ३०९०/२००५ रद्द त्यांच्यावर कार्यवाही करून ती मरण पावलेली व्यक्ती युसूफ बेग राज बेग वय ५५ वर्षे धंदा शेती या शेतकऱ्यांना
न्याय भेटायला पाहिजे त्यांची पत्नी शमीनाबी युसुफ बेग ,वय ४० वर्ष धंदा शेती रा.शिवणी खुर्द ता.जि. लातूर येथील रहिवासी आहे. मला ०५ मुली व दोन मुले आहेत असे की,गावातील खाजगी सावकार नाव ज्ञानदेव पंढरी सुडे हे खाजगी सावकार की करतात व व्याजी व्यवहार करतात हे माहिती होते .त्यावरून माझे पती नाव युसुफ बेग राज बेग यांनी या सावकाराकडे मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. त्यासाठी मी सावकाराना शेत गट नं .८ मधील ८१ आर जमीन सावकार ज्ञानदेव पंढरी सुडे यांचे नावे विश्वासू खरेदीखत म्हणून दि:- २८/०४/२००५ साली लिहून दिले व त्यांच्याकडून १,१०,००० रुपये एक लाख दहा हजार रुपये ५% टक्के प्रमाणे व्याजाने घेतले व, एका वर्षाचा करार केला असून त्यांना दि:- २८/०४/२००६ राजी वेळेवर ठरल्याप्रमाणे मुदल ,व्याज असे एकूण २,००,००० अक्षरी दोन लाख रुपये दिले .तरी पण सावकार म्हणतो की , एवढ्या दोन लाखाने माझे समाधान होत नाही अजून पाच लाख रुपये द्या मंग तुमची रजिस्ट्री परत करतो नाहीतर तुम्हाला जिवंत गारतो अशा धमक्या देत आहे. माझे पती नामे युसुफ बेग राज बेग यांचा सावकाराच्या जाचाला कंटाळून व दबावामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे असी माहिती त्यांच्या पत्नी शमिनाबी युसूफ बेग वय ४० वर्षे धंदा शेती रा.शिवणी खुर्द ता.जि.लातूर येथील रहिवासी आहेत व माझ्या पतीच्या आत्महत्येस जबाबदार अवैध सावकार आहे ही माहिती मयत युसुफ बेग यांच्या पत्नीने दिली आहे तर ही शेतकरी आत्महत्या ही घटना समोर आली आहर तर यावर शासन काय निर्णय घेतील हे पाहू, त्यामुळे सावकारावर गुन्हा दाखल करण्यात यावा व माझे खरेदीखत क्र.३०९०/२००५ सह दुय्यम निबंधक कार्यालय , लातूर यांना आदेशिक करून खरेदीखत रद्द करूण व माझी जमीन माझ्या नावे करून देण्यात यावी व संशयित आरोपींच्या विरोधात युसूफ बेग राज बेग यांनाआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक अधिनियम ३९,४५,४६,५०४,५०६,३४ आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे मयत यांची पत्नी शमीनाबी यांनी सांगितले, अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसुन संशयित आरोपी फरार झाल्याचे वृत्त दिसुन आले आहे तरी याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूर यांनी लवकरात लवकर करावा