दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवि दिल्ली : त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजप-आयपीएफटी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर माणिक साहा यांनी आज आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर सलग दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, त्रिपुरामधील भाजपच्या मोठ्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
काँग्रेस आणि माकपच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी, ते भाजप सरकारच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालणार आहेत, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे त्रिपुरात पुन्हा एकदा सत्ता आल्यानंतर त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, यासंदर्भात चर्चा सुरू होत्या. पण सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजप पक्षश्रेष्ठींनी माणिक साहाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, अशी घोषणा केली.