दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर मधील तुकूम प्रभागातील छाबडा लेआऊट मधील जनता डीपी रोड अभावी अनेक समस्यांना समोर जात आहे याबाबत येथील लोकप्रतिनिधी तसेच मनपा प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा येथील रोडचे काम पूर्ण न झाल्याने यासंदर्भात येथील जनतेने आप चे शहराध्यक्ष योगेश भाऊ गोखरे यांना रोड संदर्भात तक्रार दिली असता आज चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना सदर रोड चे काम तात्काळ करून देण्यात यावे अन्यथा तुकूम प्रभागातील जनतेला सोबत घेऊन आम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला, यावेळेला आपचे शहराध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजू कुडे, शहर उपाध्यक्ष सुनील सदभय्ये, शहर सहसंघटन मंत्री सिकंदर सगोरे, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, पार्टीचे जेष्ठ पदाधिकरी मधुकर साखरकर काका, शहर मीडिया प्रमुख सुधीर पाटील, अनुप तेलतुंबडे, भीमराव मेंढे, प्राध्यापक एस पी साळवे, पी एन तेल्हाडे, सुधाकर गुरपुडे, सचिन जुनगरी व इत्यादी प्रभागांतील नागरिक आणि कार्यकर्ता उपस्थित होते.