
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार: नवापूर येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय स्वराज्य सेनेची बैठक घेण्यात आली त्यावेळेस राष्ट्रीय स्वराज्य सेना ची राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. हरी साहेब पागल यांच्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेची पक्षबांधणी निमित्त नंदुरबार जिल्हा दौरा दरम्यान राष्ट्रीय स्वराज्य सेना चे नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी सुनिल भिमराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षबांधणी कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.
महाविकास आघाडीचे केंद्रीय घटक पक्ष आहे मात्र राष्ट्रीय स्वराज्य सेनेची ताकद देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वरिष्ठ पातळीतील तसेच पदाधिकाऱ्यांच्या मागणीला स्वागत करत यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच महा विकास आघाडी सरकारमध्ये तेव्हाही होतो आणि आताही आहोत असेही राष्ट्रीय स्वराज्य सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. हरी साहेब बागल यांनी सांगितले. यावेळी अनिल साठे, प्रदीप चौधरी ,महेंद्र जाधव, विकास जाधव तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते